
खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय यांची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :-चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करीचे प्रमाण जास्त वाढले असून यावर आळा घालण्यासाठी रात्रीच्या अंधारात खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या टीमने केली धडक कारवाई.आज दि. 19/12/2021 रोजी रात्री 2.00 वा. नियतक्षेत्र तळोधी 1 व तळोधी 2 मधील कक्ष क्र. 43 व 44 च्या नाला बाउंड्री मध्ये के. डब्लु, धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी, के. वी. गुरनुले क्षेत्र सहाय्यक तळोधी, आर. जे. गेडाम, क्षेत्र सहायक खडसंगी तसेच डी. आर. बल्की नियत वनरक्षक तळोधी,
पी. एच. आनकार्ड नियत वनरक्षक, अलिझजा, एस. एस. टापरे, वनरक्षक तळोधी एस. एस. मेश्राम, वनरक्षक, खडसंगी- जी. एम. हिंगणकर, वनरक्षक, खडसंगी – हे सामुहिक गस्त करीत असतांना अवैध्य रेती उत्खनन करणारे पॉवर ट्रॅक्टर रंग निळा Euyo 50 (नोंदणी क्रमांक नसलेले) व ट्रॉली क्र. MH 34 BF 86 55 रंग लाल आढळून आले.
सदर ट्रॅक्टर चालकाचे नाव कवडु महादेव नन्नावरे रा. शेडेगाव व ट्रॅक्टर मालकाचे नाव दिनेश मनोहर डांगे रा. शेडेगाव असुन वनगुन्हा क्र. 09728/ 243177 दि. 19/12/2021 अन्वये वनगुन्हा नोंदवून पंचनामा तयार करुन ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. असून पुढील कार्यवाही जो. गुरुप्रसाद, उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, अभिजित वायकोस, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-1) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.