Breaking News

हमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर,दि. 20 डिसेंबर: पणन हंगाम 2021-22 मधील हमीभावाने तूर खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी प्रक्रिया तर दि. 1 जानेवारी 2022 पासून खरेदी प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.

हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या करिता दि. 20 डिसेंबर पासून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी संपुर्ण माहितीसह कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, कोरपना ता.खरेदी-विक्री सहकारी संस्था ( खरेदी केंद्र राजुरा- गडचांदूर), चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था चंद्रपूर (चिमूर) या खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved