
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी (प्र):-वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत दवलामेटी म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या स्मारिका रमेश विरखेळे (२१) या तरुणीने घरातल्या सीलिंग चा हुक्क ला ओढणी चा सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याने विरखेळे कुटुंबावर दुःखाचे डोंगळ कोसळले तसेच परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे.
मृतक मुलगी एस. बी. जैन कॉलेज, फेटरी कळमेश्वर रोड. इंजिनियरिंग चा दृतिय वर्षाची विद्यार्थिनी असून, आई , वडील व लहान बहिणी सोबत म्हाडा कॉलनी दवलामेटी येथे राहत होती. आई लॅब टेक्निशियन असून , वडिल प्रायव्हेट कंपनीत कामाला आहेत. वडील कामाला आणि लहान बहिणी शाळेत गेली असता आईला लॅब मध्ये सोडून मृतक स्मरिका घरी आली. घरी कुणीच नसताना आतून कडी लाऊन ओढणी सीलिंग चा हूक्क ला बांधून आत्महत्या केली. भांडे घासनारी बाई सकाळी ८:०० वाजता घरी आली तेव्हा सदरघटना लक्षात आली. आत्महत्या चे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास वाडी पोलिस करीत आहेत.