Breaking News

आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर नेरी येथे संपन्न 140 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/नेरी :- चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना नेरी शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले,शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य नीतिन मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, व विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे यांचे मार्गदर्शनात

शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी विठल रुख्मिनी मंदिर नेरी येथे संपन्न झाले, शिबिराचे उद्घाटन ग्राम पंचायत सदस्या संगीता कामडी, सौ जनबन्धु यांचे हस्ते शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, तालुका संघटक रोशन जुमड़े, सुशांत इंदुरकर, विलास मोहिनकर यांचे उपस्थित संपन्न झाले, शिविरात 140 नागरिकानी तपासणी केली,

कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता, शहर प्रमुख चेतन पीसे यांचे नेतृत्वात कामेश नगराले, मदन शिवरकर, डॉ.अनिल चव्हाण, डॉ.प्रतीक चव्हाण, डॉ.तेजस ठोम्बरे, डॉ.एकनाथ शिंदे, प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर यांनी अथक परिश्रम घेतले

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved