
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-येथील वाय. एस. पवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अध्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली.प्रभारी प्राचार्य वैद्य सर यांच्या अध्यक्षतेखाली मानवंदना पार पडली.
शिक्षकवृन्दानी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर विचार प्रदर्शन करून समाजबदलाचा पाया रचण्यात हे किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले.कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य वैद्य सर, प्रा.सुनिल गभणे , प्रा.मेहरकुरे सर, कऱ्हाडे मॅडम, रामटेके मॅडम, धनोरे मॅडम, वाटगुरे मॅडम, लिपिक दीक्षांत रामटेके, शिपाई स्वप्नील डांगे,पराग चवरे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.