Breaking News

क्रीडा प्रबोधिनीमध्ये 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत खेळाडुंच्या निवड चाचणीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु घडविण्याचे उद्देशाने संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य प्राप्त खेळाडूची शोध मोहिम राबविली जात आहे.

7 फेब्रुवारी 2022 पासुन ही टॅलेंट सर्च मोहिम राबविली जाणार असुन यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळांडुना प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील एकुण 9 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रिया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्यावतीने भरती प्रक्रिया सुरु करणार आहे. यासाठी दि. 21 ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करुन खेळांडुची राज्यस्तर चाचणी करीता निवड केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी, ज्युडो, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल-टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक्स या खेळांचा समावेश आहे.

ज्या खेळांडुचे वय 19 वर्षाच्या आत आहे अशा खेळांडुची या निवासी प्रशिक्षण शिबीरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळांडुना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी तंत्रशुध्द प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा शासनाच्या वतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जाईल. तसेच राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

उपरोक्त क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचण्याकरीता पदक प्राप्त, राष्ट्रीय सहभाग खेळाडूंनी दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त करून विहित नमुन्यातील अर्जा सोबत क्रीडा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड इत्यादी कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved