Breaking News

लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार

संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे. नागपुरात लतादीदी जेव्हा जेव्हा आल्यात, त्यावेळी त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. आमचं बालपण, आमचं तारुण्य,आमचं कार्यकर्तृत्व फुलवण्याचं काम या एका अजरामर आवाजाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो ‘, हे गाणं ऐकताना भावनिक झाले होते. त्यांचा सूर असा ह्दयाला हृदयाशी जोडणारा होता. आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत आणि मानवी समाजामध्ये ऐकण्याची कला जीवंत असेपर्यंत लतादीदींना कोणीही विसरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे जाणे,संपूर्ण भारतीय समाजाला जागतिक स्वर -सुरांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुरेल व अजरामर गीतांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या देशभक्तीला शतशः प्रणाम करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

 

सुनील केदार

पशुसंवर्धन,दुग्धविकास युवक कल्याण व क्रीडा मंत्री, महाराष्ट्र

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved