Breaking News

वडीलाने घरा बाहेर काढले म्हणून मुलाने केली चोरी

पोलिसांनी आरोपीला केले अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नेरी येथील एका सतरा वर्षीय तरुणाने वडीलाने घराबाहेर काढले म्हणून शांती वार्ड तील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील रकमेवर कुलूप तोडून मारला डल्ला सदर चोरी झाल्याच्या दर्ग्यातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली आणि दि 22 जुलैला एका तरुणावर संशय येताच पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चोरी करणाऱ्या संशयित सतरा वर्षीय तरुणाला अटक करताच त्याने चोरी केल्याचे कुबल करीत 20 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले,

सविस्तर वृत्त असे की नेरी येथील शांती वार्डात हबिबखा उस्ताद दर्गा असून या दर्ग्यावर नेहमीच भक्त भाविकांची पूजा अर्चा करण्यासाठी ये – जा असते आणि दर्ग्यातील दान पेटीत भाविक दान करीत असतात नेहमी प्रमाणे सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपूर्वी दर्ग्यातील दानपेटी फोडल्याचे निदर्शनात येताच दर्गा कमेटीने पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली, त्यानंतर 2 दिवसांनी त्याच परिसरात राहणार एक तरुण नामे नयन विलास राऊत वय 17 वर्षें हा कुठल्याही प्रकारचे काम करीत नसून यांच्याकडे मौज करण्यासाठी कुठून पैसे आले असा संशय दर्ग्या कमिटीच्या लोकांना येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ नेरी येथे येऊन तरुणाला ताब्यात घेतले आणि चोरी बदल विचारले असता त्याची हकीकत ऐकून सर्वच दंग झाले,

सदर तरुणाला वडिलांनी घराबाहेर काढले म्हणून खाण्या पिण्यासाठी मौज करण्यासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याचे कबूल केले, सदर चोरीतील पैसाने 15 हजार रुपयांचा मोबाईल घेतला आणि 5 हजार बिअर बार मध्ये उडविले असे सांगितले सदर तरुणाला अनेक व्यसन असल्याचे बोलल्या जात असून तरुणाला पोलिसांनी अटक करीत पुढील कारवाई चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved