Breaking News

खापरखेडा येथे दोन बाईक मध्ये टक्कर;एकाचा मृत्यू ,एक गंभीर जख्मी

खापरखेडा- कोराडी देवी मंदिर मार्गावरील तुलसी मंगल कार्यालय समोर आज दुपारी एक ते दिड वाजताच्या दरम्यान अमोरा समोरील दोन बाईक मध्ये जबरदस्त धडक झाल्याने खापरखेडा निवासी 30 वर्षीय सुरज प्रभाकर तराडे याचा मृत्यू झाला, तर गौरव शैलेश कछवाहा हा गंभीर जख्मी झाला आहे.


मृतक सुरज हा आपल्या पल्सर एम एच 40 सि एफ 6251 गाडीने कोराडी च्या दिशेने जात होता तर गौरव हा कोराडी कडुन चार चाकी वाहनाला ओवर टेक करत येत असताना निजाम हाॅटेल जवळ त्याची सुरज च्या गाडी सोबत जबरदस्त धडक झाली, या धडकेत सुरज खाली पडताच त्याचे डोके रोडाच्या काठानी असलेल्या गोट्यावर आदळल्याने त्याला जबरदस्त मार लागला तर गौरव हा रोडावरच पडला त्याला डोळ्याजवळ मार लागला, सर्वप्रथम त्या दोघांना चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, सुरज ला जबरदस्त मार लागल्याने त्याला नागपूर मेयो ला पाठविण्यात आले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved