Breaking News

लंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण प्रारंभ

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तरोडा अंतर्गत

विशेष प्रतिनिधी

वर्धा:-तरोडा, सावली, मदनी ,साखरा या गावांमध्ये लंबी या चर्म रोगाच्या लसीकरण कार्याला सुरुवात झालेली आहे. ही लस मोफत आहे .कोणत्याही प्रकारचा सेवा शुल्क घेतल्या जात नाही हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे सुरू झालेले आहे .सन 2020 या रोगाचे बरेच रुग्ण होते परंतु सध्या तरी या रोगाचे रुग्ण या परिसरात आढळलेले नाही,

तरी पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारचा सेवाशुल्क न घेता त्या रुग्णावर उपचार करण्यात येईल असे आव्हान पशुवैद्यकीय दवाखाना तरोडा चे संस्थाप्रमुख डॉ. प्रदीप थूल यांनी केलेले आहे .
पशुवैद्यकीय दवाखान्याचे परिचर सतत गैरहजर असल्यामुळे डॉ.थूल यांना खूप त्रास होतो तरीही ते दिवस रात्र मेहनत करून सेवा देण्याचे कार्य अविरत करत आहे.

आज सावली या गावांमध्ये 200 गाय व बैलांना लंपी स्किन डिसीज या रोगाचे लसीकरण घरोघरी जाऊन केलेले आहे या लसीकरण कार्याला सुरज गुळघाने ,(सामाजिक कार्यकर्ता) कृष्णा गुळघाने ( दुग्ध व्यवसायिक) नारायण वाघमारे, प्रवीण चांभारे, अमोल किमांडे गणेश तीमांडे, महेश कलोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved