Breaking News

जुगारी कंपनीची बॉलिवूडमधील चित्रपटाला स्पॉन्सरशिप

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-अभिनेता सैफ अली खान व व हृतिक रोशन यांचा विक्रम वेधा ( Vikram Vedha ) हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट अधिकृतपणे ‘द लायन बुक ‘ या कंपनीतर्फे प्रायोजित केला जात आहे. ही कंपनी भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटिंगचा गोरखधंदा चालवत आहे व यातून मिळालेली हजारो कोट्यवधी रुपयांची काळी माया बॉलिवूडमध्ये गुंतवत आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या इन्वेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावयास हवी, अशी स्प्राऊट्सची ठाम भूमिका व मागणीही आहे.

‘बन निडर, दिखा जिगर, खेल इधर’ ( ‘Ban Nidar, Dikha Jigar, Khel Idhar’ ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनमधून प्रेक्षकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त केले जात आहे. द लायन बुक (The Lion Book ) ही बेकायदेशीर कंपनी आहे. या बुकी कंपनीचा मालक हा हितेश खुशलानी ( Hitesh Khushlani ) आहे. खुशलानी यांच्यावर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर तो भारतातून दुबईला पळून गेलेला आहे.

खुशलानी यांचा अभिनेता साहिल खान हा भागीदार (द लायन बुकचा सह-संस्थापक ) आहे. अशी माहिती साहिल यांनी त्यांच्या Instagram वर असणाऱ्या बायोडेटामध्ये अभिमानाने नमूद केलेली आहे.

आजमितीला साहिल खानसह संजय दत्त, सुनील शेट्टी, कपिल शर्मा, उर्वशी रौतेल Urvashi Rautela यांसारख्या शेकडो नटनट्या या The Lion Book या बेकायदेशीर कंपनीचे सोशल मीडियावरून उघडपणे प्रमोशन करतात. मात्र भारतातील मोदी सरकार, राज्य सरकार व पोलीस प्रशासन यांचे या कंपन्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यामुळे हे सर्व जण मूग गिळून शांत आहेत.

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved