प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र)
दवलामेटी प्र:-संविधान दिवस साजरा करतांना आपण सर्वांनी संविधानाचे पालन व संरक्षण करण्याचा निश्चय आपण करावा असे अध्यक्ष स्थानी असलेल्या भाषणात गावचा सरपंच रीता ताई उमरेडकर बोलतं होत्या. दवलामेटी येथील भिम शक्ती युवा मंच तर्फे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन कीर्तन व निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.सकाळी भीम शक्ती युवा मंच तर्फे दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्यात बीपी, शुगर तसेच नेत्र तपासणी चा लाभ प्रामुख्याने नागरिकांनी घेतल्याचे आयोजन कमेटीचे प्रमुख स्वप्नील चारभे यांनी सांगितले.
सर्व प्रथम संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून ,कार्यक्रमांचा अध्यक्षस्थानी आसलेल्या दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच रीता ताई उमरेडकर यांचा शुभ हस्थे महा पुरुषांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्तविक व संचालन उषा चारभे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन कमेटी तील निकेश सुखदेवे, स्वप्निल चारभे, प्रदिप रंगारी, संदेश गवई, शुभंम भालाधरे, रतन रंगारी, प्रणय पाटील, प्रविण अंबादे, आकाश लामसोंगे, अमोल भातकुलकर, उमेश सुखदेवे, राहुल मोडघरे, सुमित खोब्रागडे ,रोहीत राऊत, सौरभ नाईक यांनी अथक प्रयत्न केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष , बालक व गावातली ईतर नागरीक उपस्थित होते.