Breaking News

बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडेंची जयंती साजरी

बीड (प्रतिनिधी)

बीड:-दिनांक १२ ला बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन काल फिलिपिन्स देशातील नामांकित दवाओ शहरात मुंडे भक्त डॉ ऋषिकेश विघ्ने, डॉ महेश घुगे, डॉ स्वप्निल ठोंबरे यांच्या सह असंख्य विद्यार्थी डॉक्टरांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित डॉ धनंजय आंधळे, डॉ शशिकांत दुधरे, डॉ नवविवेक सिंग,डॉ विशाल भुतेकर, डॉ अभिलाष हर्ष सिंग, डॉ अक्षय नागरगोजे ,डॉ तुषार चौधरी, डॉ आदित्य बांगर, डॉ रोहन आंधळे, डॉ आदित्य बांगर, डॉ निशांत सानप,डॉ प्रतिक शिंदे होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved