Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून या वृत्तवाहिनीच्या सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच तंत्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लाईव्ह बातमीपत्राच्या सादरीकरणात सहभागी होत वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यात राज्यातील विकासकामे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची वाटचाल, दावोसमधून राज्यात आणलेली गुंतवणूक, सरकारने निवडणुकांचा विचार न करता विकासाला दिलेले प्राधान्य अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. यासमयी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या कामकाजाची माहिती घेऊन तिथे कार्यरत असणाऱ्या पत्रकारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे मालक गणेश नायडू, त्यांचे सुपुत्र धृमित नायडू, या वृत्तवाहिनीचे संचालक नवनियुक्त संपादक कमलेश सुतार, ज्येष्ठ पत्रकार ऋषी देसाई तसेच वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved