Breaking News

वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अनिल महस्के विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे मार्गद्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय पडोळे. डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्दवार यांचे सूचनेनुसार संपूर्ण राज्यासह चिमूर येथे वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत चिमूर येथे तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.

वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, सचिव भरत बंडे. जिल्हा सदस्य प्रमोद राऊत. विलास कोराम. साप्ताहिक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे. डिजिटल विभाग जिल्हा सहचिटणीस श्रीहरी सातपुते. तालुका सदस्य योगेश सहारे. फिरोज पठाण. सुनिल हिंगणकर. जावेद पठाण. उमेश शंभरकर. विकास खोब्रागडे. इम्रान कुरेशी. योगेश अगडे. सुयोग डांगे, उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved