Breaking News

परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर,:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 19 मे 2023 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 22 मे रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 23 मे रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर, 24 मे रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर व 25 मे रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved