Breaking News

रामदेवबाबा यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन

रामदेवबाबा यांना अटक करा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दरम्यान मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतः ची पाठ थोपटून घेतात आणि ओबीसी समाजाची “ऐसी तैसी”उच्चारून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून रामदेव बाबा यांचा निषेध नोंदवुन तहसील कार्यालय चिमुर समोर आंदोलण करण्यात आले.बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी सूद्धा सर्वस्तरातून होत आहे.

रामदेवबाबा यांचे व्यवसाय व उद्योग या देशातील ६५ टक्के ओबीसी समाज बांधवांमुळे विक्री होत आहे . ओबीसी समाजाच्या भावना अशा वक्त्यांनी दुखावल्या गेल्या त्यावेळी ओबीसी महासंघ आक्रमक रामदेव बाबा यांचा विरोधात आक्रमक झाला. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडुन आंदोलन करण्यात आले,यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमुर तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा सहसचिव रामदास कामडी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर तालुका अध्यक्ष कवडू लोहकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते, प्रभाकरराव पिसे,राजू लोणारे, संजय बावणकर ,जयदेव रेवतकर,ममता डुकरे, भावना बावणकर, वर्षा शेंडे, दुर्गा चावरे, समीर बल्की तसेच शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved