Breaking News

असं सर्वच फुकट मिळाल्यावर काम करण्याची दानत कोणाची बरे राहील ?

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- महिन्याला १५०० द्यायचे ही कल्पना कोणत्या भणंग व बेमुर्वतखोर डोक्यातुन सुचली असावी बरे ? धान्ये फुकट,एस. टी. फुकट,आता महिन्याला १५०० फुकट. म्हणजेच आळशी लोकांना अधिकाधिक आळशी बनवुन परावलंबीच करायचे नं ..!!! शेतकऱ्यांना आजच मजुर मिळत नाहीत, मजुरीचे दर भरमसाट वाढलेत त्यामुळे ते परवडत नाहीत. आणि वरून असे फुकट वाटत मजुरांची कार्य करण्याची क्षमताच संपवुन टाकायची..हा कसला आणि कुठला विकास ? बरं ही बाब एव्हढ्यावरच थांबत नाही.. ! तर या ऐतखाऊंनी पुढे काय करायचे ?. ”तर, घरी बसून सोशल मिडीया चघळत बसायचा, वॉटसप विद्यापिठाचे फेक ज्ञान मिळवायचे, हिंदु-मुस्लिम हा धंर्माधर्मांचा खेळ खेळायचा, त्यासाठी धार्मिक द्वेष पसरविणारे फेक विडीयो, संदेश चघळत चघळत बघायचेत. दात ओठ खात पुढे पाठवायचे, आपल्या विरोधकाला काऊंटर करणारे, इन्स्टा, एफबी च्या लिंक फ़ॉरवर्ड करायच्या, या सर्वातुन उरलाच वेळ तर रिकामटेकडे रिल्स बघायचे, रिल्स बनवायचे, गेम खेळायचे…!” ज्यांचे घरात चार महिला त्यांना प्रतीमहा रू ६००० फुकटचा पगार, राशनपाणी फुकट, वरून कुठे जायचे असल्यास प्रवास फुकट यालाच म्हणतात चक्रम राजा नी अंध व मेंदुरहीत बठांगुळ फुकटी प्रजा.

*और इन सबको लेकर, मेरा देश विश्वगुरु बन रहा है.*

सारांश…- रू. १५०० देण्याचा मुख्य उद्देश्य लक्षात घ्या सुजाण करदात्यांनौ, येणाऱ्या निवडणुकीत आपण परत सत्तेत आले पाहिजे यासाठी मतदारांना हे राजरोस व अधिकृत प्रलोभन आहे.करदात्यांच्या पैशाने भरलेल्या सरकारी खजीन्यातुन अधिकृतपणे निवडणुकीपुर्वीच मते खरेदी करण्याचा उद्योग नाही काय हा ?.

*महा* राष्ट्राच्या विकासाला तिलांजली देत *भिकाऱ्यांचं* राज्य बनवणाऱ्या या बेमुर्वतखोर लोकांकडे परत सत्ता सोपवायची का ? याची डोळसपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हेच अंतिम सत्य आहे.

*ताजा कलम*

*लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना यांच्या अभूतपूर्व यशानंतर राज्य सरकार गोपनीय माहितीनुसार लाडक्या दाजीच्या देशी विदेशी दारूचे भाव भरमसाठ वाढवणार आहे माझे दाजी कडून दारूतून पैसे वसूल करायचे लाडक्या बहिणीला आणि भावाला वाटायचे देवाचंच घ्यायचं आणि देवालाच लावायचं कसा आहे इलेक्शन फंडा मित्रांनो*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved