जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मुकेश जिवतोडे मैदानात उतरले असून, ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहे. वरोरा तालुक्यातील अनेक गावांना जसे गिरोला, येरखेडा, आबा मक्ता, वडगाव, साखरा, पारडी, अकोला, उमरी, बोरगाव, वडधा, सोनेगाव, भेंडाळा, शेगाव, बू, राळेगाव, बेंबळ, वायगाव (को), वायगाव (ख) चारगाव ( बु ) चारगाव (खु) अर्जुनी , कोकेवाडा, किन्नाळा, आष्टा , मानोरा ,कारेगाव, दादापूर धानोली या ठिकाणी सभेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामस्थांशी संवाद साधला असता मुकेश जिवतोडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. फसव्या योजनावर विश्वास न ठेवता या सरकारच्या शेतकऱ्याच्या हमीभावापेक्षा कमी सोयाबीन कापूस खरेदी करत असल्यावर बेधडक आंदोलन करू तसेच घरकुलाचे प्रश्न असो अथवा नाल्याचे प्रश्न असो किंवा पादन रस्ताचे प्रश्न असो जनतेचे प्रश्न मांडणार व सरकारला धारेवर धरु असे मुकेश जिवतोडे यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून खेडोपाडी आपली छाप त्यांनी बऱ्याच आंदोलनाद्वारे सोडली आहे,वर्धा पावर,GMR असो किंवा WCL च्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची मदत असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढीसाठी केलेले आंदोलन असो, त्यांचा समाजात आणि समाजा बाहेर असलेला दांडगा जनसंपर्क हा वरोरा भद्रावती तालुक्यात कोणालाही विचारल तर ते मुकेश जिवतोडे यांना बऱ्यापैकी पसंती मिळत आहे.