Breaking News

विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आ. बंटी भांगडिया यांना निवडून दया – संजय गजपुरे

नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथुर, नवेगाव येथील कॉर्नर सभेला प्रचंड प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया हे विकास पुरुष म्हणुन ओळखले जातात त्याच प्रमाणे बंटी आहेत. बोलतो तसाच चालतो नागभिड येथील अनेक विकास कामात कुठेही कमी न पडता जे जे शब्द दिलेत ते ते पूर्ण करण्याचं काम आमदार बंटी भांगडिया यांनी केलेत. मिडाळा येथे अनेक विकास कामे केलेत यापुढेही पुढील वर्षाचे विकासाचे व्हिजन आमदार बंटी भांगडिया यांचा तयार आहे. मात्र या विकासासाठी आमदार बंटी भांगडिया यांना भरगच्च मताधिक्याने निवडून पाठवा.असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांनी व्यक्त केले.ते नागभीड तालुक्यातील बाळापूर येथील कॉर्नर सभेला संबोधित करत होते याप्रसंगी भाजपचे नेते वसंत वारजूकर,भाजपा सहकार नेते गजानन पाथोडे,मदन अवघडे,धनराज बावणकर,जगदीश राऊत,व्यकंया भाकरे,चलमेलवार,विलास मोहुर्ले, भोजराज नवघडे यांचे सह असंख्य नागरीक उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार बंटी भांगडिया आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जे साठ वर्षात घडलं नाही ते आपण दहा वर्षात अनेक विकास कार्याच्या माध्यमातून शक्य करवून दाखवलं मनात इच्छाशक्ती असली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही भविष्यात पण असाच विकास कार्याचा सपाटा सुरूच ठेवणार असल्याचा आशावाद आमदार बंटी भांगडिया यांनी जनते समोर व्यक्त केला आणी येत्या 20 नोव्हेंबर ला प्रचंड मताधिक्यानी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथुर, नवेगाव तसेच विविध गावात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते कॉर्नर सभेपूर्वी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली हॊती या मिरवणुकीला गावकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतांना दिसत होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लाखोंच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चिमूर येथे भव्यसभा ठरली इतिहासिक सभा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या प्रचारार्थ चिमूर येथे आयोजित भव्य सभेला …

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई

जिल्हाधिका-यांनी पारीत केले आदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved