Breaking News

गृहमतदानासाठी यंत्रणा पोहचली लोकांच्या दारी

जिल्ह्यात आतापर्यंत 2080 नागरिकांचे घरून मतदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दिनांक 13 : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात यंत्रणेने नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2080 मतदारांनी गृहमतदान करून समाधान व्यक्त केले. यात 85 वर्षांवरील 1711 मतदारांचा तर 369 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

असे आहे विधानसभानिहाय गृहमतदान : राजूरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 85 वर्षांवरील 478 मतदारांनी आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या 53 अशा एकूण 531 मतदारांनी गृहमतदान केले. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 24 असे एकूण 221 मतदारांनी गृहमतदानात सहभाग घेतला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 238 आणि दिव्यांग 84 असे एकूण 322 मतदारांनी, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 251 आणि दिव्यांग 79 असे एकूण 330 मतदारांनी, चिमूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 265 आणि दिव्यांग 64 असे एकूण 329 मतदारांनी तर वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 282 आणि दिव्यांग 65 असे एकूण 347 मतदारांनी गृहमतदान केले.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सुचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लाखोंच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चिमूर येथे भव्यसभा ठरली इतिहासिक सभा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या प्रचारार्थ चिमूर येथे आयोजित भव्य सभेला …

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई

जिल्हाधिका-यांनी पारीत केले आदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved