जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- केंद्र स्तरीय नावीन्यपूर्व नवरत्न स्पर्धा २०२४/२५ या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर मुले येथील प्राथमिक शाळा विध्याथ्यानी सहभाग घेतला व शाळेतील चिमुकल्या रत्नानी प्रथम क्रमांक प्राप्त करीत शाळेचे नाव रोशन केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाधीकारी चंद्रपूर यांनी केंद्र स्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कथा कथन स्पर्धा. स्वेमस्फुर्ती भाषण स्पर्धा. वाद विवाद स्पर्धा. एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा. बुद्धीमापन स्पर्धा. चित्रकला स्पर्धा. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा. स्वेमफुर्ती लेखन. स्मरण शक्ती स्पर्धा. अश्या विविध स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ चिमूर या ठिकाणी करण्यात आले होते.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले चिमूर येथील अनुष्का दीपक मीसार चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. तृप्ती धनराज नागोसे हिचा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक. विधी श्रीहरी सातपुते हिने स्वयंस्फूर्ती भाषण स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. रिया अमोल दिघोरे. आरोही सुधीर गायकवाड यांनी स्पर्धेत सहभाग घेत प्रोत्साहन बक्षीस प्राप्त केले.जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मुलेच्या मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे. सहायक शिक्षिका सरिता गाडगे शिक्षण सेविका सोनू कामडी यांच्या अथक प्रयत्नांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त केला. नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेतील चिमुकल्या रत्नांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.