Breaking News

कडबी चौकातील सनातन धर्म युवक सभेत आरोग्य शिबीर

प्रतिनिधी नागपूर

नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कडबी चौकातील सनातन धर्म युवक सभेत बाह्य संपर्क आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्‌घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मंगळवारी झोनच्या सभापती प्रमिला मंथरानी, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिक धान, इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निधी कडबे, डॉ. मिनल तिरपुडे उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण पैशाअभावी स्वत:वर उपचार करीत नाही. आरोग्य तपासणी करीत नाही. अशा व्यक्तींनाही आरोग्य सेवा देता याव्यात, यासाठी शहरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लोकसहभागातू असे शिबीर घेण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यविषयक विविध प्रकल्प आणि उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तद्‌नंतर सेव्हन स्टार हॉस्पीटलमधील तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल येथील डॉक्टरांच्या चमूने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. विविध आजारांबाबत यावेळी नागरिकांनी तपासणी करून घेतली. तपासणीसोबतच डॉक्टरांच्या चमूने आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता अधिपरिचारिका सिल्विया सोनटक्के, वर्षा चव्हाण, शिला सय्याम, लिना तागडे, बकुली अरमरकर, प्रमिला अरमरकर, अंकिता हुलडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईश्वर चहांदे, लेखापाल भूमेश्वर भाजीपाले, सनातन धर्म युवक सभेचे पदाधिकारी नेहार शर्मा, मिलन सहानी, अजय सहानी यांचे सहकार्य लाभले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved