Breaking News

पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्यावत 23 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिल्ह्यात आतापर्यंत 77 रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 5 ऑक्टोबर: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्यावत 23 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे पार पडला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार, व प्रादुर्भाव थोपविण्याकरीता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणि दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. सदर 23 रुग्णवाहिकापैंकी 20 रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित 3 रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत जिल्ह्याला 47 रुग्णवाहिका व 30 लसीकरण वाहने अशी एकूण 77 रुग्णवाहिका आरोग्यसेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी 20 रुग्णवाहिका खनिज निधीतून, 7 रुग्णवाहिका राज्य शासनाकडून, 27 रुग्णवाहिका महापारेषण विभागाकडून तर 23 रुग्णवाहिका राज्यशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved