Breaking News

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला गुन्हा दाखल

प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- एका महिलेने चक्क पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या २१ वर्षीय महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले होते. व महिलेचा असा आरोप आहे की पतीने तिला मारहाण केली असून तिचे घाणेरडे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. या प्रकरणी नागपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या महिलेने असाही आरोप केला आहे की लग्नापूर्वी तिच्या पतीने तिला दुसरे लग्न असल्याचे सांगितले नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची भिलाई येथे जानेवारी महिन्यात भेट झाली होती. आरोपी तरुण गोंदियाचा रहिवासी आहे. यानंतर दोघांनी दुर्ग येथे लग्न केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर महिलेला तिच्या पतीचे दुसरे लग्न असल्याचे समजले. त्याला एक मुलगी सुद्धा आहे. जेव्हा महिलेने तिच्या पतीला याबद्दल विचारले तेव्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला तिच्या घरी सोडले.

केलेल्या आरोपानुसार, जेव्हा ती महिला भिलाई येथे परत आली तेव्हा तिच्याशी पतीने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले आणि तिला मारहाण केली. १९ ऑक्टोबर ला महिलेने या प्रकरणी तिने पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved