Breaking News

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बँरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार

नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 26 मे : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चिचडोह बॅरेज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दि. 15 ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved