
प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर
कल्याण:-तंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत आज सकाळी ११-वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच मुख्यालयातील विभाग खातेप्रमुख यांचे उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी महापालिका मुख्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातही सकाळी-११:००-वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम करण्यात आला, सदर समूह राष्ट्रगीत गायनाचे वेळी संबंधित प्रभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता,
ऑन ड्युटी अधिकाऱ्यांना अशी काम दिली तर सर्व सामान्य करदात्या मतदात्या नागरिकांची कामे कधी होणार,
७४-वरून-५९-वरती पालिकेच्या मराठी शाळा गेल्या पण आजही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे कल्याण-डोबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्याची अमृत महोत्सव निमित्तने स्वराज्य सप्ताह घेतलेले नाही आहे का?? अशी चर्चा यावेळी सामान्य जनतेत होत आहे.