
मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे फटका
नागपूर, ता. १६ : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. नागपूर शहरातील आशीनगर, सतरंजीपुरा, नेहरूनगर आणि लकडगंज या चार झोनमधील पाणीपुरवठा यामुळे प्रभावित झाला असून पुढील ४८ तास याचा फटका बसणार आहे.
मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे १५ ऑगस्टपासून नवेगाव-खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. तोतलाडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नवेगाव खैरीचे दरवाजे किमान पुढील ४८ तास उघडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कन्हान नदीच्या खालच्या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून नदीच्या पाण्याची पातळीही २७६ मीटरपर्यंत गेली आहे.
मनपा-ओसीडब्ल्यू कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या इनटेक विहीर रोझपीसचे चोकेज, कोरड्या विहिरी पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत. जॅकवेलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्कूबा डायव्हर्ससाठी गाळ साफ करण्यासाठी नदीच्या पाण्यात १० मीटर खोल जाण्याचे अत्यंत मोठे आव्हान समोर आले आहे. यामुळे, कन्हान येथून पंपिंग १६ ऑगस्ट, २०२२ रोजी पहाटे बंद करण्यात आले. त्यानंतर, फक्त लहान स्लॉटमध्ये आंशिक पम्पिंग होते. याचा विपरित परिणाम, आशीनगर झोन, सतरंजीपुरा झोन, नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनमधील (४५% नागपूर) भागात राहणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. ज्यांना कन्हान WTP फीडरवरून पाणीपुरवठा होतो. मुख्य फेड ESR च्या जल संसाधन विभाग (WRD) च्या सुचनेनुसार, कन्हान नदीतील पाण्याची पातळी १६ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री उशीरापर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.