Breaking News

मास्टरमाइंड व आरोपी मोकाटच मुंबईतील दारूखाना सेक्स स्कँडल

जगदीश का. काशिकर,
९७६८४२५७५७

मुंबई:-‘मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी १ सप्टेंबर रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकात प्रसिद्ध झाली व ‘मॅनेज’ झालेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले. त्यानंतर लगेचच ३ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड व इतर आरोपी अद्यापही गायबच आहेत, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे.

या प्रकरणात जवळपास १५ हून अधिक आरोपी असावेत, असा संशय आहे. यापैकी आतापर्यंत फक्त ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेला ८ दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही मास्टरमाइंडसह इतर आरोपी फरार आहेत.

या नराधमांना पकडण्यास दिरंगाई होत आहे, यामुळे हे आरोपी पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पीडित महिला अद्यापही या नराधम व त्यांच्या नातेवाईकांच्या दबावामुळे तक्रार करण्यास पुढे येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कसं घडलं प्रकरण?

सन २०१९ पासून १५ ते १६ गटार साफ करणारे नराधम या सेक्स स्कँडलमध्ये सामील आहेत. साधारण: २१ ते ३० या वयोगटातील ही तरुण मुले आहेत. या नराधमांनी पहाटे ४ वाजेपर्यंत जवळपास ४० ते ५० कुटुंबातील महिलांचे आंघोळ करताना, कपडे बदलताना, शरीरसंबंध ठेवतानाचे शूटिंग केले आहे.

आतापर्यंत त्यांनी महिलांचे नग्न व्हिडीओज काढले व त्यातील काही पीडित महिलांना ब्लॅकमेलिंगही केले, अशी खात्रीलायक माहिती पीडित महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना सांगितले आहे.

पीडित व स्थानिक नागरिकांचे काही प्रश्न:

गटार साफ करणाऱ्या या युवकांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, चेन, लॅपटॉप, मोबाईल्स, कॅमेरे अशा महागड्या वस्तू आल्या कशा ?

पोलिसांच्या अधिकृत प्रेस नोटनुसार, हे प्रकरण सन २०१९ व २००२० या कालावधीत घडले, मग पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी कोणतीही कारवाई का केली नाही?

हे प्रकरण शिवडी पोलीस स्टेशनच्या मागे ( हाकेच्या अंतरावर ) असणाऱ्या बोट हार्ड रोडवरील गल्ल्लीतही दररोज रात्री घडत होते, मात्र याचा पोलिसांना यापूर्वी सुगावा लागला नव्हता काय? पोलिस अद्यापही पीडित महिलांना विश्वासात घेत नसल्यामुळे त्या पुढे यायला धजावत नाही. त्यांच्यावर अदयाप आरोपी व संशयितांचा दबाव आहे काय?

“पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे, यासंदर्भात मी लवकरच मुंबईच्या पोलीस कमिशनरांची भेट घेणार आहे.”

अजित पवार,
विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र

“या प्रकरणाची व्याप्ती वाढू नये व शिवडी पोलीस ठाण्याची प्रतिमा मलीन होवू नये, यासाठी पोलिस कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत, त्यामुळे मी स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.”

डॉ. मनीषा कायंदे,
शिवसेना नेत्या

“दारूखाना येथे झालेले सेक्स स्कँडल हे प्रकरण भयानक व माणुसकीला काळे फासणारे आहे. याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, हेही स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणाचा मी स्वतः पाठपुरावा करणार आहे”.

चित्रा वाघ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश,
भारतीय जनता पार्टी

सहकार्य:-उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार

गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या …

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved