
मंगेश नरसिंह चिवटे,कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे मनोगत
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नागपुर:-नागपुर हिवाळी अधिवेशनात एका चर्चेदरम्यान आपण संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुनुरुज्जीवित केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या गतिमान कार्याचा आवर्जून उल्लेख केला.
पाठीवर कौतुकाची थाप पडली तर अर्थातच प्रोत्साहन मिळते. माझं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच मनोबल वाढविल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सोबतच राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच २०१४ साली मी मांडलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेला मूर्त स्वरूप मिळाले आणि या योजनेमुळे त्यांच्या कार्यकाळमध्ये हजारो रुग्णांचे प्राण वाचले. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी केलेल्या पाठपुराव्याचे साक्षीदार तत्कालीन स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात साकारावी यासाठी पवार आणि सुमितजी वानखेडे यांनी त्यावेळी मला खूप मदत केली होती.फडणवीस साहेब यांची भेट त्यांनीच घडवून आणली होती. गोरगरीब रुग्णांप्रति संवेदनशील असणारे अभिमन्यूजी पवार आज आमदार आहेत, याचा सार्थ अभिमान आहे.