
चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चित्र: संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष गावात अंधार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन लावले पथदिवे शोभेची वस्तू ठरत असल्याचे आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांच्यार सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करुन सौर ऊर्जाचे पथदिवे ग्रामीण गावात जागोजागी लावण्यात आले होते.
परंतु संबंधितांकडून पथदिव्याचे देखरेख नसल्याने गेल्या काही वर्षांपासून पथदिवे शोभेची वस्तू बनली असल्याचे आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे आरोप विनोद उमरे यांनी केला आहे.पथदिव्याचे दुरुस्ती करुन सुरू करण्याची मागणी विनोद उमरे यांनी केली आहे.
शासनाचे लाखो रुपयांचा दुरुपयोग
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात गाव खेड्यात संबंधित अधिकारी फिरकत नसल्याने शासनाच्या कोणतेही काम असो निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने व शासनाच्या लाखो रुपयांचा दुरुपयोग होत असल्याने याकडे संबंधित वरिष्ठांनी दखल घेण्याचे गरजेचे असल्याचे विनोद उमरे यांनी म्हटले आहे.