Breaking News

अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कृषी विभाग मार्फत- शेतकरी प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक 31/05/2023 रोज बुधवारला अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस,उमरेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने INMH-121 मधील चिमूर तालुक्यातील कपर्ला येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. आणि खालील विषयावर माहिती देण्यात आली.

अंबुजा सिमेंट फाउंडेशन,उत्तम कापूस प्रकल्पा बद्दल माहिती,जमिनीची पूर्व मशागत, माती तपासणी चे महत्व व फायदे,बियाण्याची निवड बीज प्रक्रिया,पिकाची फेरपालट,लागवड अंतर, आंतरपीक,दशपर्णी अर्क, जीवामृत निर्मिती व वापर, जैविक खतांची निर्मिती व वापर, बियाणांची उगवणी क्षमता चाचणी, महिला सक्षमीकरण,स्त्री – पुरुष समानता,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने बद्दल माहिती देण्यात आली.

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पातगरत स्मार्ट कॉटन प्रकल्पा बद्दल माहिती,कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना (महाडीबीटी)बाबब माहिती. इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आहे, यावेळी कार्यक्रमात कृषि विभागाचे एन.ए.माटे सर -मंडळ कृषी अधिकारी,बि.सी.फरकाडे-कृषी पर्यवेक्षक,डी.एम.दातारकर-MTG,पि व्ही. रेंगे सर -कृषी सहाय्यक,बि. बि. एवले-कृषी सहाय्यक,पि.के. देशमुख -कृषी सहाय्यक अधिकारी उपस्थित होते, तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस प्रकल्पाचे प्रक्षेत्र अधिकारी- पुनम खंडारे,प्रतिक शेंडे व गावातील ग्रामस्थ शेतकरी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved