Breaking News

कार ट्रॅव्हल्सच्या धडकेत सहा जणाचा मृत्यु

नागभिड-नागपुर रोडवरील कान्पा गावाजवळ भीषण अपघात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

नागभिड:-कारने एका खाजगी ट्रॅव्हल्सला नागभिड – नागपुर रोड वर कान्पा गावा जवळ जोरदार धडक दिल्याने अल्टोकार मधील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असुन दोन गंभीर असल्याने एकाला नागभिडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यातील मृत्यू झाला आहे.तर ९ वर्षाच्या बालीकेला नागपुर येथे नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारला दुपारी ३.५० वाजता घडली असुन,गडचिरोली येथिल नागपुरला दररोज चालणारी खाजगी ट्राँव्हल नागभिड वरुन जात होती.तर नागपुर वरुन अल्टो कार नागभिडकडे येत असतांनाच कानपा गावा जवळ कारने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.मृतक रुषीकेश राऊत रा.नागपुर (२०), रोहन विजय राऊत रा.नागपुर(३०), गिता राऊत रा नागपुर (४५),सुनिता रुपेश फेंडर रा नागपुर (४०) यामीनी रुपेश फेंडर (९) रा.नागपुर, प्रभा सोनवाने (४०) रा लाखनी अशी मृतकांची नावे आहेत.हे सर्व जण ब्रम्हपुरी तालुक्यात येत असलेल्या किन्ही येथील गावा कडे कौटुंबिक कामासाठी अल्टोकार क्रमांक एम.एच.४९ डि.आर.२२४२ या गाडीने येत होते.ते दुपारी नागपुर वरुन २ वाजताच्या सुमारात निघाले होते.

नागभिड -नागपुर या मार्गावरील कान्पा गावा जवळ नागभिड वरुन येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स या कारने जोरदार धडक दिल्याने त्या कार मध्ये बसलेल्या चार जणाचा जागीच मृत्यू झाला. ही अल्टो कार या परिवाराने घरा जवळील रोशन सदाशिव टागळे यांच्या मालकीची होती. यांना मागुन आणली होती. तर दोघा जणांचा दवाखान्यात नेत आसतांना मृत्यू झाला.घटना स्थळी क्षणात लोकांनी धाव घेतली.लगेच नागभिड पोलिस स्टेशनला या घटनेची माहीती देण्यात आली.

नागभिड पोलिस घटना स्थळी पोहचुन कार मध्ये फसलेल्या मृतकांना बाहेर काढुन नागभिड शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला.खाजगी ट्रॅव्हल्स मधील बसलेल्या प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे अशी माहीती आहे. भीषन अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.इतका मोठा अपघात या रोड वर पहील्यांदाच घडला असे बोलल्या जात आहे. या घटनेचा पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved