Breaking News

अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम व दागिन्यांसह चोर पसार

परीसरात खळबळ – पोलीस चोरांच्या शोधात

भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये जवळे प्लाट येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ३,५००/-रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवाच्या मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रकरणातील फिर्यादीचे नाव बंडु कडुकर राहणार जवळ प्लाट येथील असून ते त्यांच्या सासरी बडवाईक यांचे घरीच वरच्या मजल्यावर राहतात, सासरे हे खालील माळयात एकटे राहात असल्याकारणाने त्यांचे कुटुंब रोज सासऱ्याकडे झोपायला यायचे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर सर्व कुटुंब सासऱ्याकडे झोपण्यासाठी आले होते.

सकाळी वरच्या मजल्यावर गेले असता घराचे कुलूप तोडून असल्याचे दिसून आले, आत प्रवेश करुन घराची तपासणी केली असता तीन तोळयाची सोन्याचे पदक, आणि दोन चार ग्रॅमचे सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम ३,५००/-रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असून अज्ञात चोरट्यांन विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय …

बौद्ध धर्म गुरु यांनी भीम जयंती चित्रपटाला लावली हजेरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वर्धा :- भीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved