Breaking News

चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर

2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे योगदान राहील : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि.25 : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जागर करत या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना व्यक्त केली.

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.05 वाजता भारताच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान – 3 हे मिशन यशस्वी करून दाखविले. या गोष्टीचा जोश नागरिकांमध्ये होताच. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात डौलाने फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्साह अभुतपूर्व होता. सांस्कृतिक विभाग (म.रा.), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आले होते.

प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुजा सावंत तसेच प्रसिध्द गायक नंदेश उमप यांच्यासह जवळपास 300 कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात शिवराज्याभिषेक सोहळा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, वारक-यांच्या वेशातील सादरीकरण, देवीचा जागर, अस्सल मराठी नृत्य, पोवाडा, सीमेवरील जवानांच्या वेशातील सादरीकरण अशा विविध नृत्यांनी आसमंत दणाणला. चांद्रयान मोहिमेचे यश, वैज्ञानिकांचे परिश्रमाचे फळ आणि देशभक्तीचा जागर असा त्रिवेणी संगम बुधवारी चंद्रपुरात अनुभवायला मिळाला.

 

2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे योगदान राहील : पालकमंत्री ना. मुनगंटीवार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. 2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे नक्कीच योगदान राहील, अशी अपेक्षा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

चांदा क्लब ग्राऊंड येथे ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपला देश हा सर्वात प्रथम असला पाहिजे. भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपण भद्रावती येथून सीमेवरील आपल्या सैन्यासाठी बॉम्ब पाठवितो. चंद्रपुरात 122 एकर मध्ये असलेल्या सैनिक स्कूलमधून भविष्यात देशाच्या रक्षणासाठी हे सैनिक जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले चंद्रपूर नेहमी अग्रेसर असले पाहिजे, चंद्रपुरचा गौरव वाढावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही पालकमंत्री  मुनगंटीवार यांनी केले.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘साद सह्याद्रीची….भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री पुजा सावंत, सोनाली कुलकर्णी आणि गायक नंदेश उमप यांचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved