Breaking News

सावली येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळ्याचे आयोजन

 

सुरज गुळघाने

वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले. सावली येथे हनुमान मंदिर परिसरामध्ये नंदी पोळा भरवण्यात आला असून यावर्षी 141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी झाले. लहान मुलाचा उत्साह वाढावा त्यासाठी पाच बक्षीस ठेवण्यात आले प्रथम बक्षीस वासुदेवराव शिद यांच्या कडून, द्वितीय बक्षीस गणेश भाऊ ईखार शिवसेना जिल्हाप्रमुख वर्धा यांच्या कडून, तृतीय बक्षीस निखिल वासुदेवराव शिद यांच्या कडून, चतुर्थ बक्षीस गणेशभाऊ ईखार यांच्या कडून,पाचवे बक्षीस हेमंत गुळघाणे यांच्या कडून देण्यात आले.

प्रथम पुरस्कार स्वरांश वाघमारे, द्वितीय पुरस्कार अन्विक शिद, तृतीय पुरस्कार वेदिका वाघमारे, चतुर्थ पुरस्कार श्रवण कलोडे, पाचवा पुरस्कार कार्तिक बोरकर यांना देण्यात आले.नारायणराव नागपुरे यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने गुढी फिरवण्यात आली व सर्व मुलांना शाळेमधे नेण्यासाठी टिफिण डब्बे देण्यात आले व या कार्यक्रमासाठी बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved