Breaking News

वाहतुक व्यवस्थेचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रहदारीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 10: चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान, वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दि. 17 ऑक्टोबर 2023 च्या सकाळी 8 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी निर्गमित केले आहे.

अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग:

या कालावधीदरम्यान गरजेनुसार नागपूरकडून, चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सि.टी.पि.एस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. मुलकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प-सावरकर चौक-वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका चौक येथे थांबविण्यात येतील. बल्लारशाकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प पलीकडे डि.आर.सी.बंकर, बायपास रोड येथे दिक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहुन थांबविण्यात येतील.

शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरिता रहदारी व्यवस्था:

जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.बी. दवाखानापर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह-जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळुन) वरोरा नाका- उड्डानपुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टँड-प्रियदर्शनी चौकमार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर आणि वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळुन) घेवुन जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेट कडून, रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी-प्रियदर्शनी चौक-बस स्टॅंड-सिद्धार्थ हॉटेल-उड्डानपुल मार्गे नागपूर कडे जातील.

दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक-जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक-मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक आणि मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये.

दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक तसेच दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडीयम दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्येच ठेवावी. आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता-पुट्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल-वरोरा नाका ते पिंक प्लॅनेटपर्यंत “नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

दीक्षाभूमी सोहळ्यास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ:

नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगण, जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान, वरोरा नाका पिंक प्लनेटच्या उजव्या बाजूला श्री. भटीया यांची जागा या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

शहरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता:-

लोकमान्य टिळक हायस्कुल(जिल्हा स्टेडीयमच्या मागे), जिवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे) याठिकाणी वाहने पार्क करावीत.

मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकूम परिसरातून येणाऱ्या वाहनाकरिता:-

कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड याठिकाणी वाहने पार्क करावीत.

तरी, धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी सर्व बौध्द बांधवांनी व अनुयायांनी वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषीत पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved