Breaking News

दवलामेटी पोट निवडणूक, चुरस पुर्ण होणारं लढत!

मतदार यादीत घोळ करणाऱ्या वर कायदेशिर कार्यवाही व्हावी नागरिक करणार मागणी

प्रतिनिधी – नागेश बोरकर

दवलामेटी प्र./नागपूर:-नागपूर ग्रामीण तालुका तील दवलामेटी ग्राम पंचायत या ना त्या कारनाने नेहमीच चर्चेत असते. अतिक्रमण कायदा अंतर्गत वॉर्ड क्रमांक साहा येथील सदस्य अपात्र झाल्या मुळे येणारा ०५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घोषीत झाली त्या अनुसंघाने वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी युती चा अंकीता घरडे, काँग्रेस समर्पित शैलेश खोब्रागडे, तसेच भारतीय जनता पक्षाचे मयूर मानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ही लढत रंगत दार होण्या चे चित्र इथे दिसून येत आहे.नव्याने जबरदस्त एन्ट्री करणारा वंचित बहुजन आघाडी पक्षा ने मागील निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणून ग्रामपंचायत सरपंच पद मिळवले होते व या पोट निवडणूकित वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी सोबत युती करून उमेदवार उभा केला मुळे यां महिला उमेदवार पण मुसंडी मारून विजय संपादन करणार अशी चर्चा आहे.

कारण या वॉर्डांत वंचित आणि बी एस पी पक्षाचे मते जोडली तर मोठ्या फरकाने अंकीता घरडे या महिला उमेदवार निवडून येऊ शकतात असे गणित वर्तविले जात आहे निवडनुक होत असलेल्या वॉर्ड क्रमांक सहा येथील अपात्र होणारे सदस्य काँग्रेस पक्षाचे असल्या ने काँग्रेस कार्यकर्त्या मध्ये आपलाच उमेदवार जिंकणार याची शाश्वती आहे. भाजपचे उमेदवारा ने सुध्दा मागील निवडणुकीत बरेच मत्त घेतले होते व फार कमी मता ने ते पराजित झाले होतें म्हणुन थोडे अधिक प्रयत्न केले तर भाजप उमेदवार पण या निवड नुकीत जिंकू शकतो असां भाजप कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्या मुळे निवडणुकीचा रणागणात उतरलेले तिन्ही उमेदवार तुल्य बळ असल्याचे लक्षात येते.

परंतु मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची माहिती मिळाली आहे. परीसरात राहणारे प्रकाश मेश्राम, विजय इंगळे, प्रणय पाटील, विजय घरडे, शोभा कांबळे , आशा घरडे, गीता मेश्राम, जोत्सणा बेले, स्वप्नील चारभे, निकेस सुखदेवे, सोनु मोटघरे, रोहीत राऊत, सतीश नकोसे व ईतर नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम मतदार यादी मध्ये ईतर वॉर्डातील, बाहेर गावातली 400 चा जवळपास मतदारांचे नावे असल्याची शक्यता आहे. वॉर्डातील लोक प्रतिनिधि निवडून आणण्याचा अधीकार फक्तं त्याच वॉर्डातील मतदारांचे आहे. मतदार यादीत घोळ झाल्या मुळे मदादरांचा अधिकारावर अळा बसतो. लोकशाही पद्धतीने होणारी निवडणूक बाधित होतें. म्हणुन मतदार यादीत घोळ झाल्या बाबद योग्य चौकशी करून ईतर वॉर्डातील व्यक्ती या वॉर्डांत मतदान केले तर त्याचा वर, दोषींवर प्रशासकीय अधिकाऱ्यानं वर दंडातमक कायदेशिर कार्यवाही व्हावी अशी तक्रार आम्हीं जिल्हा अधिकारी साहेबांना करणारं असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved