Breaking News

ते मुस्लिम धर्माचे आहेत, म्हणुन कामावर घेत नाहीत

मुस्लिमांना कामावर न घेणाऱ्या कंपनी विरोधात वंचित बहुजन आघाडी पुकारनार तीव्र आंदोलन

प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी प्र:-वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन, “इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव लिमिटेड ” या कंपनीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. देशाचा उपराजधानी नागपूर ग्रामीण मधील बाजारगाव, शिवा सावंगा येथील लिमिटेड कंपनीत धार्मिक वाद पाळला जातो हि अतीशय लाजिरवाणा व घृणास्पद प्रकरण समोर आले आहे.वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारगाव जवळ शिवा सावंगा गावात इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव लिमिटेड नावाची कंपनी आहे.

या कंपनीत स्थानीय लोकांना रोजगार मिळावा ही अपेक्षा गावकरी करतात परंतु याचं गावात व जवळ पास राहणारे मुस्लीम व सिख तरुण कितेक दा कंपनीचा गेट वर काम मागण्या साठी जातात तेव्हा त्यांना मुस्लीम व सिख समुदायाचे आल्याने कंपनीचे अधिकारी परत पाठवतात. एका विशिष्ट धर्माचा चा असल्याने कामा वर न घेणे हे बेकायदेशीर आहे.हा व्यक्ती स्वतंत्र व मूलभूत हक्कांचे हनन आहे संविधानाचे अपमान आहे.मुस्लिम बांधवांना ते मुस्लिम असल्यामुळे त्यांना त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी नाकारण्यात येते संपूर्ण देशांमध्ये मुस्लिम बांधव प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे सरकारी क्षेत्र असो किंवा खाजगी शेत्र असो. मुस्लिम समाजाबद्दलचा हा त्या कंपनीचा खालचा पातळीचा विचार हा समाजात तेड निर्माण करणारा आहे. मुस्लिम समाजाला या प्रकारची वागणूक म्हणजे क्रूरतेची भावना आहे.

येणाऱ्या एक आठवड्यामध्ये कंपनी मालका विरोधात तसेच कंपनी संचालक मंडळावर कायदेशिर कार्यवाही झाली नाही तर, आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे असे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे यांनी निवेदनात म्हटले. सोबत मनीष भाऊ बोरकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण वंचित बहुजन युवा आघाडी, प्रसन्ना दुरुगकर, शहर अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी. सुमेध गोंडाने , वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा.यशवंत भाऊ चव्हाण , वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा सरचिटणीस व अतुल भाऊ शेंडे वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष नागपूर जिल्हा या वेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved