Breaking News

चिमूर तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) अंतर्गत विहिरगांव येथील एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक २९/१०/२०२३ रोजी पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बेलारा इथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसें वय वर्षे ४९ रा.विहिरगाव,तह.चिमूर, जिल्हा चंद्रपूर अशी मृत व्यक्तीचे नाव आहे.

वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गावातील नागरिकांना माहिती होताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी सुद्धा अनेक वेळा वाघाच्या हल्लात गुराखी, शेतकरी जखमी झाले असून जिव सुद्धा गमवावे लागले आहे. या घटनेमुळे विहिरगाव बेलारा या गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. वन परीक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम यांनी वनविभागाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे नेण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved