Breaking News

रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला नियमित मिळावे यासाठी उद्याला सोसायटीच्या छतावर चढुण प्रहारचे आंदोलन

प्रहारचे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठान व प्रहार सेवक प्रवीण वाघे या॓ची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नेरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या 201 अंतर्गत रेशन चे गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते मात्र याच संस्थेने धान्य उपलब्ध असूनही मागील दोन महिन्यापासून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले नसल्याने अनेक लाभार्थी हे धान्यापासून वंचित झाले तसेच आनंदाच्या शिधा वितरित करण्यात आला त्यातील धान्याची किट ही अनेकांना मिळाली परंतु उर्वरित अनेक लाभार्थ्यांच्या खाते पुस्तिका मध्ये किट दिल्याचे खतवुन सुद्धा धान्याची किट दिलेली नाही त्यामुळे या संस्थेत खूप मोटा भ्रष्टाचार झाला असल्याचे लाभार्थी ओरडत असून या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे‌.

याचं अनुषंगाने गोरगरीब जनतेला न्याय मिळावा त्यांना दोन महिन्याचा राशन मिळावा ,ज्यांना किट मिळाली नाही त्यांना किट देण्यात यावी तसेच या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जनतेला न्याय मिळावे यासाठी दिनांक 30 ऑक्टोबरला शांततेच्या मार्गाने संस्थेच्या छतावर चढून प्रहार संघटनेचे प्रहार सेवक प्रविण वाघे आंदोलन करणार आहेत आणि आपल्या प्रमुख मागण्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहारचे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठान व प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी बोलून दाखविला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved