Breaking News

मराठा आरक्षण नाही तर दिवाळी साजरी करायची नाही “ना फटाके, ना कपडे, ना फराळ

दिवाळीत फक्त लक्ष्मी देवीच पुजन करुन दिवे लावावेत.बाकी देवाचा नैवेदय सोडून काहीही करायचे नाही

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755

शेवगांव:-सकल मराठा समाजबांधवांनी एक निर्णय घ्यायचा ठरवला असुन त्या निर्णयाला सर्व मराठा समाजबांधवांनी पाठींबा द्यावा अशी अपेक्षा आहे. सदर निर्णय असा आहे की जर मनोज जरांगे पाटलांसारखा एक असामान्य मावळा सर्व समाजबांधवासाठी परत आमरण उपोषणाला बसला असेल तर आपणही त्यांना जोरदार साथ देण्यासाठी व *या सरकारच व राजकिय नेत्यांच डोक ठिकाणावर आणण्यासाठी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा संकल्प करावा.* यंदाच्या दिवाळीत फक्त लक्ष्मी देवीच पुजन करुन दिवे लावावेत. *बाकी देवाचा नैवेदय वगळता कुठलाही गोडधोड पदार्थ करायचा नाही,एकही फटाका विकत घ्यायचा नाही,नवे कपडे विकत घ्यायचे नाहीत,घरांवर रोषणाई करायची नाही…* एकंदरीत सांगायचा हेतु हाच की यंदाची दिवाळी अगदी साधी सरळ करायची आहे कारण तिकडे जरांगे पाटील बिना अन्नपाण्याचे रहात असतांना आपण दिवाळी साजरी करणे अत्यंत लज्जास्पद ठरेल.

आता या मुद्याचा दुसरा एक महत्वाचा फायदा हा असेल की संपुर्ण समाजाने जर दिवाळी साधी करायचा निर्णय जर घेतला तर राज्याच आर्थिक गणित कोलमडुन जाईल व सरकारवर व्यापार्यांचा दबाव वाढेल आणी यामुळ सरकारला कळुन चुकेल की मराठा शांततेत सुध्दा कसा धक्का देवु शकतो.आणी आपण हे केल्याने मनोज जरांगे पाटलांच्या या लढ्याला एक प्रकारे खुप मोठ बळ देवु शकतो.कारण तुम्ही पाहिल असेल की लाखोंची सभा झाली,जरांगे पाटलांच उपोषण परत सुरु झालय,गावागावात साखळी उपोषणासोबतच पुढारी बंदी झाली तरी या सरकारला फरक पडत नाहीय म्हणुन आता असहकार आंदोलन पुकारुन जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी करायची नाही ही भुमिका जर बांधव घेणार असतील तर सरकारलाही लवकर यावर तोडगा काढावाच लागेल.म्हणुन सकल मराठा समाज, सुलतानपूर तर्फे मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाज,महाराष्ट्र यांना विनंती आहे की आमच्या या भुनिकेवर विचार करुन सर्व समाजाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा.आणी परत सांगतो ही पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल करावी.

*अविनाश देशमुख शेवगाव सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved