Breaking News

खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक

विशेष प्रतिनिधी-गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.

 

खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही,

यानंतर दुसऱ्या वाहनाने खा.नेते गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा.नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दुखापत झालेली नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.
लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त करतो.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved