Breaking News

सत्य घटनेवर आधारित ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई:-राम कोंडीलकर

मुंबई:एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचा १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटात मल्याळम चित्रपटसृष्टीतले कौशल्यवान अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी कमालीचा अभिनय सादर केला आहे.

ड्युटी पूर्ण करून एस.आय सेथू आपल्या गर्भवती बायकोला दवाखान्यात बघायला जात असताना त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खून केलेल्या दोषीला पकडण्याची जबाबदारी येते. त्या खुनीचा मागोवा घेत सेथूला सोलोमन या व्यक्तीची माहिती मिळते. सोलोमनचा हृदय पिळवटून टाकणारा भूतकाळ ऐकून सेथूही भावनिक होतो. असा काय असेल भूतकाळ? हे चित्रपटात कळणार आहे.

“विविध भाषेतील विविध शैलीचे चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या माध्यमातून तमाम मराठी प्रेक्षकांना सादर करण्याचा आम्हाला नेहमीच अत्यानंद होतो. यासारखे अनेक बहुभाषी चित्रपट मराठीत रूपांतर करून जगाला जवळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
*App link:*
https://ultrajhakaas.app.link
*’पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक*
https://www.facebook.com/UltraJhakaas
https://www.instagram.com/ultrajhakaas
https://www.youtube.com/@ultrajhakaas

जनसंपर्क:राम कोंडीलकर,
राम पब्लिसिटी, मुंबई
इमेल: ramkondilkar.pr@gmail.com
मोबाईल – WhatsApp : 9821498658

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

  अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया …

13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved