Breaking News

श्रीगोंदयात रविवारी शिवपानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर मार्गदर्शन बैठक

पिढ्यान पिढ्या शेतरस्त्यांसाठी चाललेला संघर्ष संपवण्यासाठी एकजुट व्हा~ शरद पवळे

श्रीगोंदा:-दिवसेंदिवस जमिनीची वाढती तुकडेकरी त्यातुन शेतरस्त्यांचा निर्माण होत चाललेला गंभीर प्रश्न यावर पारनेर तालुक्यात गेल्या सहा वर्षांपासुन सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीला विविध आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप निर्माण झाले असुन राज्यातील अनेक शेतकरी या चळवळीमध्ये सक्रिय होत असुन अनेक तालुक्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरीक पुढाकार घेत असुन यामध्ये प्रामुख्याने शेतरस्त्याच्या शेवटच्या व्यक्तीला मोठा संघर्ष याठिकाणी करावा लागत आहे याचा गांभिर्याने विचार करत पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहाने याचिकर्ते शरद पवळे यांनी ॲड. प्रतीक्षा काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालय ,औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक ८२४७/२०२३ मधील१७/०७/२०१७ रोजीच्या निर्णयानुसामार पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिव पाणंद शेतरस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याबाबतचा आदेश काढण्यात आला सदर आदेशास अनुसरून दि.११/११/२०२१ रोजी महाराष्ट्र शासन नियोजन विभाग रोहोयो,यांनी विविध योजनेच्या अभिसरणमधुन मातोश्री ग्रामसमृधी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यात शासन निर्णयातील नमुद मजकुरानुसार तालुका पातळीवर तहसिलदार यांनी शेतकरी व नागरीकांचे शेत पाणंद व शिव रस्त्याबाबत प्रश्न निकाली काढण्याबाबत पुढाकार घ्यायाचा आहे.

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकामी यापूर्वी पारनेर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्यांचे प्रश्न शासन निर्णय ११/११/२०२१ मधील सुचनांचे पालन येत्या ६० दिवसाच्या आत निकाली काढण्याबाबात तहसीलदार यांना आदेशीत केले आहे. याच धरर्तीवर सदर निकाल व याचिकेच्या प्रत यांच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्यासंदर्भातील अर्जाला आदेशाची प्रत जोडत शिवपाणंद शेत रस्त्यांसाठी त्रस्त झालेले वर्षानुवर्षे या रस्त्यांचा प्रश्नामुळे दळवळण, आपापसातील तंटे यांचे वाढलेले प्रमाण यामुळे मामलेदार कोर्टात मोठ्या प्रमाणावर केसेस दाखल होत आहेत दि.११/११/२०२१ शासण निर्णयानुसार प्रत्यक्ष पाहणी करत पाणंद व शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन सदर रस्ते खुले केल्यास शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील यां संदर्भातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या जोडून दिलेल्या तपशीलानुसार प्रत्यक्ष पाहणी व नंतर सुनावणी घेत ६० दिवसात निकाली काढाव्यात व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे यासंदर्भातील श्रीगोंदा मार्केट यार्ड येथे चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यासाठी शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत तरी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उभे रहावे अशी पत्रका द्वारे आवाहन शिव पाणंद शेतरस्ता नवनिर्माण श्रीगोंदा तालुका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved