Breaking News

चोरांनी पळविली घरासमोरील दुचाकी

अज्ञात चोरा विरोधात वाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी:-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आठवा मैल दवलामेटी येथील आठवडी बाजारात मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना नेहमी होत असतात. परंतु 29 नोव्हेंबरच्या रात्री पालकर नगर येथील रुपेश कळमकर यांची पॅशन प्रो दुचाकी क्र. एम एच 40 ए एच 4292 त्यांचाच घरा समोरून चोरीला गेली ,दुसऱ्या दिवशी पहाटे झोपेतून जागे होताच सदर चोरीची घटना त्यांचा निदर्शनात आली परीवारातील ईतर सदस्य व रुपेश ने जवळ पास सर्व ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला.

परंतु दुचाकी कुठेच आढळून आली नसल्याने वाडी पोलीस स्टेशनं गाठून रुपेश ने अज्ञात चोरा विरोधात तक्रार दाखल केली. सदर घटने मुळे परिसरातील नागरिकांत भीती चे वातावरण पसरले असून वाडी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायंन्नवार यांनी कसून तपास करण्याची हमी देत चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असे फिर्यादी ला सांगण्यात आले वाडी पोलीस दुचाकी चोरटयाच्या मुसक्या आवरण्यात किती यशस्वी होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री …

‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान

लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बाकीची काम त्याच दिवशी करायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved