Breaking News

एसटी बस खड्डे चुकवित असतांना गेली शेतात

एक गंभीर जखमी तर सोळा प्रवासी किरकोळ जखमी

डॉ.सतीश वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशी व गावकऱ्यांनी केले
रास्ता रोको आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर: -भिसी -शंकरपुर मार्गातील रस्त्यावरील कवडशी देश फाट्यावर रस्त्यातील खड्डे चुकविताना बसचा स्टेरिंग राड तुटला आणि त्यामुळे बस शेतात घुसल्याने एक प्रवासी गंभीर जखमी तर सोळा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे .त्यामुळे संतप्त प्रवासी तसेच परिसरातील कवडशी पाचगाव, आजगाव ,खैरी, शंकरपूर येथील नागरिकांनी व डॉ.सतीश वारजुकर यांनी रस्ता रोको आंदोलन केले. आणि जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपविभागीय अभियंता समीर उपगंडलावार या ठिकाणी हजर होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात येणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे तीन तास चालणाऱ्या या आंदोलनात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या.

मागील दोन वर्षापासून या राज्य महामार्गाची दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडलेले आहे. या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक सोबत राजकीय संघटनेने सुद्धा निवेदन दिलेले आहे .परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही. या खड्ड्यामुळे कितीतरी अपघात झालेले असून मंगळवार ला सकाळी चिमूर वरून भंडारा ला जाणारी बस क्रमांक mh 40 BL 3988 खड्डा चुकवत असताना कवडशी देश फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये जवळपास 90 प्रवासी होते त्यात एक प्रवासी जखमी तर 16 प्रवासी व शालेय विद्यार्थी जखमी झाले आहे. सदर जखमी प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे उपचार सुरू आहेत. तर काही प्रवाशांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.ही बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर यांना माहीत होताच त्यांनी रुग्णवाहिका बोलाऊन जखमी प्रवाशांना दवाखान्यात पाठविले. तसेच आज पर्यंत दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे प्रवाशी व परिसरातील नागरिकांसह डॉ.सतीश वारजुकर यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले .तसेच शंकरपूर ग्रामपंचायतचे सरपंच साई वारजूकर यांनी प्रवाशांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली.

भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत व चिमूर चे ठाणेदार मनोज गभने हे ताफ्यासह हजर झाले. व जमावाला शांत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नागरिकांनी जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता समीरउपगंडलावार हे घटनास्थळी हजर होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन थांबवणार नाही असा हट्ट धरला त्यामुळे ठाणेदार प्रकाश राऊत यांनी पोलीस ची गाडी पाठवून इंजिनीयर यांना पोलीस संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपगंडलावर यांना पोलीस संरक्षणात घटनास्थळी उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम बुधवार पासून तर नवीन रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आदोलन मागे घेण्यात आले. माजी उपसभापती रोशन ढोक, कवळशी चे उपसरपंच बाबा देशमाने ,खैरी चे माजी उपसरपंच लक्षमन खेडेकर, दामोधर ननावरे ,अशोक चौधरी,नितीन सावरकर, आसू हजारे ,तसेच बरेच काँग्रेस कार्यकर्ते , ग्रामीण परिसरातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved