Breaking News

२ मार्च ला वैशाली नगरात व्याख्यानमालाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- बुद्ध विहार समन्वय समिती भंडारा, समता सैनिक दल, सम्राट अशोक सेना,साकेत बौद्ध विहार,शास्त्री नगर,सद्धम्म बौद्ध विहार, विशाखा बौद्ध विहार, वैशाली नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सद्धम्म बौध्द विहार, वैशाली नगर, खातरोड,भंडारा येथे बौद्ध समाज व मागासवर्गीयांचे सामाजिक, बौध्दिक,आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशाने दर शनिवारला विविध विषयांवर व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत असते.
शनिवार दि. २ मार्च २०२४ ला सायंकाळी ७.३० वाजता बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर द्वारे दिलेल्या २२ प्रतिज्ञा चे वाचन आयु. राजकुमार कांबळे हे सादर करतील. त्यानंतर भदंत भिख्खू टननकर महाथेरो, नागपूर द्वारे पाणातिपाता वेरमणी, खिक्खापदं समादियामि।। १।। या प्रथम शील (शील ) याचा अर्थ व विवेचन, डाॅ. बाबासाहेब यांनी बौद्ध धम्माची दिक्षा देतेवेळी २२ प्रतिज्ञाची अट का दिली यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved