Breaking News

श्रीक्षेत्र वरुर भक्तराज पुंडलीक देवस्थान समीतीचा पंढरीचा वारकरी पुरस्कार हभप.उद्धव महाराज सबलस यांना प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीक्षेत्र वरुर धाकटी पंढरी येथील त्रिवेणी संगमावर नानी नदीच्या वाळवंटामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वकाळात प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य शिवमहापुराणकथा उत्सव नुकताच संपन्न झाला. कथा प्रवक्ते ह भ प जगदीशानंद महाराज शास्त्री यांनी शिवोपासनेमागील वैज्ञानिक तत्वाचे मार्मिक चिंतन अभ्यासपूर्ण शैलीतून मांडले.गावातील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिवपुराणग्रंथ, पार्थिव शिवलिंग मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा व भव्य दिंडीसोहळा पार पडला. गावातील सर्व महिलांनी सप्ताहानिमित्त अखंड वीणा पहारा सेवा केली.

सप्ताह काळात ह भ प राम महाराज झिंजुर्के, शेवगावच्या दिवाणी न्यायाधीश एस .यु.जागुष्टे, तहसीलदार प्रशांत सांगडे, सौ राणीताई निलेश लंके,प्रभावती प्रतापराव ढाकणे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी महेश गव्हाणे यांनी भेट देवून शिवआरतीचा मान स्वीकारला. सर्वदर्शनाचार्य ह भ प विठ्ठल महाराज चनघटे शास्त्री यांच्या अमृततुल्य कालच्या कीर्तनसेवेने उत्सवाची सांगता झाली.प्रतिवर्षीप्रमाणे भक्तराज पुंडलिक मंदिर देवस्थान समितीच्या वतीने दिला जाणारा सातवा पंढरीचा वारकरी पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प उद्धव महाराज सबलस यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कृष्णा राजीव राजळे ,गोरक्ष महाराज उदागे, विष्णुपंत महाराज शास्त्री, मुकुंद महाराज अंचवले ,सरपंच, उपसरपंच ,देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजश्रीताई घुले म्हणाल्या निष्ठावंत वारकरी जीवनाचा यथार्थ गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे .कारण त्यांच्या सदाचरणामुळेच नवीन पिढीला सांप्रदायिक सेवेचे आकर्षण वाटते व त्यामुळेच संत विचारांचे अनुसरण करणारा नीतीमुल्याधिष्ठित समाज घडतो. धाकटी पंढरी म्हणून अध्यात्मिक दृष्ट्या विशेष लौकिक असणाऱ्या देवस्थाने दिलेला हा पुरस्कार गौरवास्पद आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved