Breaking News

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी शेवगाव शहर झाले भगवे मय

* सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन “जय श्रीराम” च्या घोषणांनी शहर दनाणले *

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये आज दिनांक 20 एप्रिल 2024 वार शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील प्रसिद्ध डी. जे. “डॉन नंबर वन” प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचा सजवलेला भव्य रथ “रामभक्त हनुमानाच्या” मूर्तीचे सजीव रुप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते होते हजारो तरुण राम भक्त संत गाडगेबाबा महाराज चौकातून निघालेल्या मिरवणुकीमध्ये भगवा शर्ट “जय श्रीराम” नावाचा पंचा आणि हातात “भगवा झेंडा” घेऊन “जय श्रीराम” “जय श्रीराम” च्या घोषणा देत होते,शहरातील मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक आतिषबाजी ही करण्यात आली होती शहरात सगळीकडे आज राममय वातावरण झाले होते‌.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी रॅपिड ऍक्शन फोर्स राज्य राखीव पोलीस दल आणि अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पोलीस दल यांच्या साह्याने चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता शेवगाव शहरातील मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी पेठ मोची गल्ली खाटीक गल्ली येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून पहाट पासूनच रहदारी बंद केली होती नगर रोड मिरी रोड पाथर्डी रोडची वाहतूक शहरातील इतर मार्गांवरून वळवण्यात आली होती मुख्य बाजारपेठेमध्ये आणि नवी पेठ मध्ये पायी चालणारा सुद्धा प्रवेश नव्हता त्यामुळे शहरातील नागरिकांची भर उन्हात अतोनात हाल झाले दुपारनंतर शहरात अघोषित बंद सारखीच परिस्थिती होती सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद करून भव्य मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी नगर रोड पाथर्डी रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्थानका समोरील क्रांती चौक येथे तुफान गर्दी केली होती महिला अबाल वृद्ध यांनीही भव्य मिरवणुकीचा आनंद घेतला.

*ताजा कलम*

*भव्य शोभायात्रा शांततेत पार पाडल्याने शेवगाव पोलीस आणि बाहेरील मागवलेली कुमक यांनी सुटकेचा श्वास सोडला शेवगाव शरद दंगल झाल्यापासून डी.जे. वाजविण्यावर बंदी आहे शेवगाव शहरासह तालुक्यातील रामभक्तांनी चार ते पाच तास मनमुराद आनंद घेतला*

*{ क्रमशः }*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved